धुळे | शिवजयंती निमित्त संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय डे’ (दारूबंदी) जाहीर केलेला असतानाही, शहरातील मुख्य केंद्र असलेल्या पाच कंदील परिसरात उघडपणे दारू विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूबंदी खाते नेमकं काम करते काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
नेमकी घटना काय?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दारूबंदी लागू केली होती. मात्र, पाच कंदील भागात काही ठराविक दुकानांमध्ये आणि अड्ड्यांवर छुप्या पद्धतीने दारूची विक्री सुरू होती. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल?
या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण काही जागरूक नागरिकांनी केले असून, याचा व्हिडिओ उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या तयारीत
”दारूबंदीच्या दिवशीच जर असे प्रकार घडत असतील, तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचे? प्रशासनाने या भ्रष्ट कारभाराची चौकशी करायला हवी.”संतप्त नागरिक, धुळे
कारवाईची मागणी
भर चौकात सुरू असलेल्या या प्रकारामुळे धुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.











