धुळे: आईकडून वारंवार लग्नासाठी करण्यात येणारा तगादा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कौटुंबिक कलहामुळे एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना धुळ्यात समोर आली आहे. शहरातील चितोड रोड परिसरातील वैभव जितेंद्र सोनवणे या तरुणाने डास मारण्याचे औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सोनवणे याच्या मागे त्याची आई गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी सतत घाई करत होती. “लग्नाचे वय झाले आहे, आता लग्न उरकून घे,” असे म्हणत आईकडून वारंवार मानसिक दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून वैभव सध्या आपल्या आजी आणि काकांकडे राहत होता. आईचा त्रास इतका वाढला होता की, काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या आजीसोबत पोलीस स्टेशन गाठून आईविरुद्ध तक्रारही केली होती.पोलीस तक्रार आणि आत्महत्येचा प्रयत्न वैभवने कालच पोलीस स्टेशनमध्ये आईच्या त्रासाविरुद्ध NC दाखल केली होती. मात्र, मानसिक तणाव कायम असल्याने अखेर काल रात्री १२ ते १ च्या सुमारास त्याने राहत्या घरी डास मारण्याचे औषध प्राशन केले. विषारी औषध घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलवले.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूसध्या वैभववर धुळे शहरातील देवपूर भागातील शतायु हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असली तरी डॉक्टरांचे त्याच्यावर बारकाईने लक्ष आहे. कौटुंबिक स्तरावर लग्नासारख्या विषयावरून तरुणांवर येणारा दबाव आणि त्यातून उद्भवणारे नैराश्य या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.










