धुळे: अहिर सुतार समाजाचा स्वाभिमान आणि तब्बल ११३ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या ‘श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खान्देश, धुळे’ यांच्या वतीने शनिवारी (दि. ३१) प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला. जुने धुळे येथील कुंभार खुंट परिसरात आयोजित या सोहळ्याने सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला.
ब्रिटिश काळात १९११ साली स्थापन झालेली ही संस्था (रजि. नं. ०३/१९११) गेल्या अनेक दशकांपासून समाज प्रबोधन, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य अविरत करत आहे. या परंपरेला साजेसा हा उत्सव यंदाही पार पडला.
धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद
जयंती उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता प्रभू विश्वकर्मा यांच्या पूजनाने झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता महाआरती करण्यात आली. दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ समाजबांधवांनी सहकुटुंब घेतला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. अनुपभैय्या अग्रवाल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष मा. गजेंद्र अंपळकर, माजी आमदार बाबासो. श्री. राजवर्धनजी कदमबाडे, आमदार दादासो. राघवेंद्र भदाणे आणि माजी महापौर श्री. चंद्रकांत सोनार उपस्थित होते. तसेच माजी मंत्री तथा माजी खासदार श्री. सुभाषजी भामरे आणि माजी आमदार बाबासो. कुणालजी पाटील यांनी बाहेरगावी असल्याने शुभेच्छा संदेश पाठवून कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या.

यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासो. के.डी. मिस्तरी, आप्पासो. भिकाजी जगताप, दादासो. टी.डी. देवरे, भाऊसो. पी.जी. सुतार, अण्णासो. रमेश देवरे, नानासो. सुभाष अहिरे, अण्णासो. राजेंद्र गवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पदाधिकारी व सदस्यांचे परिश्रम
संस्थेचे अध्यक्ष पै. श्री. नरेंद्र शंकर हिरे, उपाध्यक्ष श्री. संतोष पांडुरंग मिस्तरी, कार्याध्यक्ष श्री. दीपक यशवंत शार्दूल, सचिव श्री. महेंद्र गोपाळ शार्दूल यांच्या नेतृत्वाखाली व कार्यकारिणी सदस्य श्री. प्रकाश सोनवणे, सुनील भामरे, मनोज खेडणार, किरण जगताप, भगवान मिस्तरी, मधुकर हिरे, दत्तात्रय जाधव, सागर मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी श्री. पंडित आबा मिस्तरी, पराग अहिरे, निलेश सूर्यवंशी, पंचम मोरे, प्रभाकर मोरे, दिलीप देवरे, विजय गवळे, विजय मोरे, निलेश खैरनार, दीपक अहिरे, नितीन कापडणीस सर यांच्यासह समस्त अहिर सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजाने संघटित राहावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.












