धुळे: रेल्वे स्टेशन रोड वरील रेल्वे बोगदयाकडे जाणा-या रस्त्यावर एक इसम दहशत माजविण्याच्या उद्देशाने त्याचे कंबरेस गावठी बनावटीचे पिस्तुल (गावठी कट्टा) बाळगुन असल्याबाबत माहीती मिळाली असुन त्याचा शोध घेवुन त्याचेवर शहर पोलीस यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आले आहे.
पोसइ/प्रशांत राठोड यांनी शोध पथकातील अंमलदार व पंचासह धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन रोड वरील रेल्वे बोगदयाकडे जाणा-या रस्त्यावर शोध घेतला असता मिळालेल्या माहीतीच्या आधारे एक इसमास विचारपूस केली असता तो उडवा उडवी चे उत्तर देउ लागल्याने पोसइ/राठोड यांनी पंचा समक्ष सदर इसमास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव साहिल सुनिल केदार वय २१ वर्षे, रा. नारायण मास्तर चाळ , चितोड रोड, धुळे असे सांगितले त्यानंतर सदर इसमास वरील बातमीची थोडक्यात हकिकत सांगुन त्यास त्याची अंगझडती घेणे बाबत विचारले असता तो अंगझडती देण्यास तयार झाल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याच्या कमरेला डाव्या बाजुला पॅन्टच्यामध्ये २५०००/- रुपये किंमतीचा एक गावठी पिस्तल,२०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस मिळून आला आहे.साहिल सुनिल केदार वय २१ वर्षे, रा.नारायण मास्तर चाळ, चितोड रोड, धुळे याचे ताब्यात वरप्रमाणे वर्णनाची एक गावठी पिस्तल (गावठी कट्टा) व दोन जिवंत काडतुस असे मिळुन आल्याने ते हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. धुळे शहर पो. स्टे. गुरनं ८७/२०२५ भारतीय हत्यार अधिनियम सन १९५९ चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / गणेश पवार हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांतजी धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे, मा. पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/प्रशांत राठोड तसेच शोध पथकाचे अंमलदार रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, तुषार पारधी, अमित रनमळे, अमोल पगारे, प्रशांत नाथजोगी, अमोल कापसे, धम्मपाल वाघ, योगेश ठोकुर, व राकेश मोरे, हनिफखॉ पठाण, संजय रनदिवे यांनी केली आहे.
