धुळे : आरोपी अनेक दिवसापासून दिवसा घरफोड्या करत होता व असंख्य पोलीस ठाणे मध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु धुळे तालुक्यातील एका बुरझड व कापडणे येथे घरफोडी झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत व लाखोंचा मुद्देमाल सहित आरोपी ताब्यात आहे.
दिनांक 18 मार्च 2025 रोजी फिर्यादी मीराबाई विठोबा पाटील, यांचे राहते घरातुन अज्ञात चोरट्याने दिवसा घराचे कुलूप तोडुन, सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याने सोनगीर पोलीस स्टेशन येथे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल होता.तसेच दि.19 मार्च रोजी फिर्यादी रविंद्र दगा पाटील रा. इंदिरानगर, कापडणे ता.जि. धुळे यांचे राहते घरातुन अज्ञात चोरटयाने दिवसा घराचे कुलूप तोडुन, सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याने सोनगीर पोलीस स्टेशन येथे देखील घरफोडीचा गुन्हा दाखल होता.सदर घरफोडी चोरीचे गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखा, धुळे मार्फत समांतर तपास सुरु असतांना दि.23 मार्च रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीचे आधारे जळगाव जिल्हयातील अट्टल चोरटा प्रविण सुभाष पाटील, वय-32 वर्ष, रा. बिलवाडी ता.जि.जळगाव यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्याने वरील दोन्ही गुन्हयांची कबुली देवुन लाखो किंमतीचा मुद्देमाल काढुन दिला आहे. अशा प्रकारे अट्टल चोरटा प्रविण सुभाष पाटील याचे ताब्यातुन गुन्हयातील एकुण 60,000 रु रोख, एक सोन्याचे रिंग व दोन चांदीचे गोट व एक कडे (एकुण 1 Kg) वजनाचे व गुन्हयातील 1,34,000 रुपये रोख व 4 ग्रॅम सोन्याचे कानातील टॅप्स असा एकुण 3,18,595/- रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करुन दोन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. सदर आरोपी गावाबाहेरील एकांतात असलेली बंद घरांवर पाळत ठेवून दिवसा घरफोडी करतो असे समोर आले आहे व त्याच्यावर असंख्य गुन्हे असून तो सराईत गुन्हेगार देखील आहे.

