धुळे : आमची मुलगी वेबसाईटवर आलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी यांच्यासह पोलीस प्रशासन व अॅडव्होकेट मीरा माळी यांनी मोठी कामगिरी बजावली आहे धुळे शहरातील साक्री रोड येथील सोनल वानखेडे यांचे सुमन हॉस्पिटल येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गर्भपात करत असताना थेट कारवाई करण्यात आले आहे.
ही तक्रार एका गर्भपाताची असताना दुसऱ्या खोलीत एक महिला आरडाओरडा करत असताना आवाज आल्याने अजून एक गर्भपात पीडित महिला आढळून आले आहे व त्या ठिकाणी तीन महिन्याचे अर्भक घटनास्थळी पाहण्यास मिळाले . त्या सुमन हॉस्पिटल येथे त्यांचा कर्मचारी स्टाफ कुठलाही प्रशिक्षित नसताना महिलेला गर्भपात करण्याची प्रक्रिया करत होते वेबसाईटच्या तक्रारीनुसार संपूर्ण टीम त्या ठिकाणी पोहोचली वा संपूर्ण उघडकीस आला आहे त्या ठिकाणी संपूर्ण तपासणी मशीन सील करण्यात आले आहे पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार सुरत हुन गर्भनिदान तपासणी करण्यात आली होती व सुमन हॉस्पिटल येथे मोठी रक्कम ची मागणी करण्यात आली होती असे तक्रारदार यांच्या माहितीनुसार सांगितले आहे.
सदरची कारवाई आमची मुलगी वेबसाईटच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने चौकशी पथक नेमून वैद्यकीय आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी यांच्यासोबत अण्ण औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, अविनाश सोनकांबळे नायब तहसीलदार, पोलीस कर्मचारी मोनाली पगारे व वसंत गोंधळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत कायदेविषयक सल्लागार मीरा माळी व संपूर्ण टीम घटनास्थळी कारवाईसाठी उपस्थित होती.
