कर्नाटक राज्यातील सराई चोरटा खाजगी बस मधून चोरी करणारा त्याचप्रमाणे धुळे शहरातील एका प्रवासी महिलेच्या सोन्याचे दागिने चोरी केल्याने दाखल फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी शातिर कामगिरी करून आरोपी सहित दोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
फिर्यादी सौ. शोभा जगतसिंग राजपूत, या कोथरूड, पुणे येथून संगितम ट्रॅव्हल्सची स्लिपर कोच बस ने बसून धुळे येथे येत असतांना कर्वे पुतळा, महिंद्रा कोटक बैंक, कोथरूड पुणे ते धुळे शहरात साई एकता कॉलनी, सिचनभवनच्या मागे, धुळे दरम्यान फिर्यादीचे बॅगेत कपड्यात लपवून ठेवलेले चष्म्याचे प्लास्टीक बॉक्स मधील सोन्याचे दागिने त्यात सोन्याची मंगलपोत, सोन्याचा राणीहार, सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याची कर्णफुल व सोन्याची नथनी असे फिर्यादीचे मालकीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने चोरून नेले बाबत फिर्यादी यांनी धुळे शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा शोध घेण्याचे अनुषगांने मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पो. अधि. श्री.किशोर काळे, मा.उप वि.पो.अधि. श्री. राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शन व सुचनां सुचनां प्रमाणे धुळे शहर पोलीस ठाण्याचे पो.निरी. श्री. दिपक पाटील यांना तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोहेकों बापू दामू कोकणी, पोकों/सागर माळी, पोकों/संजय भामरे पोकों/संदीप ठाकरे यांचे तपास पथक कर्नाटक राज्य येथे रवाना करुन सदर पथकातील अंमलदारांनी कर्नाटक राज्यातील चित्रादुर्गा ग्रामीण पोलीस ठाणे स्थानिक पोलीसांचे मदतीने गुन्हयातील अज्ञात चोरटा दौलत ऊर्फ मुनीर खान बाबुखान, वय-३४, रा.खैरवा जागीर, पोस्ट-कुवाद ठाना-मनाबर जि.धार (मध्यप्रदेश) यास ताब्यात घेवून त्यास सबळ पुराव्यानिशी गुन्हयात अटक करून त्याचेकडून गुन्हयातील फिर्यादीचा चोरीस गेलेला माल एकुण-२,०२,५००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने त्यात सोन्याची मंगलपोत, सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे कानातील कर्णफुल व सोन्याची नथनी पांढरे मोती असलेली असे सोन्याचे दागिने हस्तगत केलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.बापू दामू कोकणी हे करीत आहेत.












