धुळे : शहरातील साक्री रोडवरील भीम नगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण होणार आहे. या कामाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. खासदार निधीतून हे काम होईल.

या वेळी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, कुसुम शिरसाठ, धनराज शिरसाठ, काँग्रेसचे इस्माईल पठाण, – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित भोसले आदी उपस्थित होते. खासदार डॉ. बच्छाव म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज परिवर्तन, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सर्वांनी आदर करावा. तसेच संवैधानिक मूल्यांप्रती निष्ठा राखत समता, बंधुता व न्यायाचा अंगीकार करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल असेही त्या म्हणाल्या.

