आरोपी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
धुळे: ह्या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की यातील तक्रारदार यांचे देवपूर येथील जैस्वाल लिकर बार नावाचे देशी दारूचे दुकान असून म.रा.वि.वि. कंपनीची विजेचे मीटर बदलून त्या जागी नवीन मीटर बसवण्याची मोहीम सुरू असताना सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या दुकानातील विजेचे मीटर म. रा. वि. वि. कंपनीच्या वतीने खाजगी इसम मुकुंद दरवडे यांनी बदलवून त्या जागी नवीन मीटर बसवले होते.त्यानंतर मुकुंद दरवडे यांनी वेळोवेळी तक्रारदार यांच्या दुकानात येऊन त्यांचे बदलविलेल्या विजेचे जुने मीटर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयात जमा केले असून त्याची तपासणी केली असता मीटर मध्ये छेडछाड करून विज चोरी केली असल्याचे सांगून त्यांची महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कार्यालयात ओळख असून तुमची तुमची सेटलमेंट करून देतो तुम्हाला 30,000/- रुपये द्यावे लागतील नाहीतर तुम्हाला 46,000/- रु दंड भरावा लागेल असे सांगून लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला. प्र. विभाग धुळे कार्यालयात समक्ष हजर राहून तक्रार दिली होती.सदर तक्रारीची पंचा समक्ष आज दि. 15.04.2025 रोजी पडताळणी केली असता खाजगी इसम मुकुंद दरवडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून मुकुंद दरवडे यांचेवर सापळा लावला असता त्यांनी तक्रारदार यांच्या जैस्वाल लिकर बार या दुकानावर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पंचांसमक्ष पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध देवपूर पोस्टे येथे भ्र. प्र. अधि. कलमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे

सदरची कारवाई सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे,पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे व सापळा व तपासी अधिकारी रूपाली रा. खांडवी,पोलीस निरीक्षक धुळे,सापळा पथक पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट,मार्गदर्शक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक अशांनी करण्यात आले आहे.
