सिंधी भाषा दिनानिमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील भगवान झुलेलाल मंदिरात महाआरतीसह महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी असंख्य सिंधी बांधव उपस्थित राहून भगवान झुलेलाल यांच्या चरणी आनंद साजरी करण्यात आला.
हिंदी भाषेला राज्यघटनेत मान्यता असून सिंधी भाषा ही आमच्यासाठी मोठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सिंधी समाजाच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी, सुरेश कुंदनाणी, उत्तम वच्छानी, सुरेश दंडवानी, हासानंद गलानी, देवानंद नानकानी, किशोर डीयालानी, प्रकाश छेती या, रवी मोटवानी, मोहन सुखिया यांच्यासह सिंधी समाज बांधव आणि महिला उपस्थित होते.

