भगवान महावीर जन्मोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 10 एप्रिल रोजी धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटना धुळे तर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. तरुण-तरुणींसह स्त्री पुरुष आणि ज्येष्ठांनी देखील शिबिरात रक्तदान केले. शिबिराला रक्तदात्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लावला.
रक्तदात्यांना आयोजकांतर्फे भेटवस्तू आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेचे तुषार बाफना, योगेश सांगवी, अनिल कांकरिया, अतुल बाफना, अनिल बाफना, उज्वल दुग्गड, मयूर छाजेड, सचिन छाजेड, कीर्तीकुमार ताथेड, नरेंद्र नहार, सुयोग खिवसरा, धीरज बाफना, विजय दुग्गड, महावीर बागरेचा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

