भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश द्वारा संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान महावीर स्वामी जन्मोत्सव आणि भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक 10 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत कार्ड विशेष अभियान राबविण्यात आले.
धुळे शहरातही भाजपा जैन प्रकोष्ट तर्फे अग्रवाल विश्राम भवन येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या विशेष अभियानात ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड नसेल त्यांना कार्ड बनवून देण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला. याप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र संयोजक दीपक जैन, जिल्हाध्यक्ष उमेश जैन, सचिव महेंद्र चंडालिया, खजिनदार गणेश बोरा, उपाध्यक्ष दिलीप कुचेरिया, दिपक चत्तरमुथा, जैन प्रकोष्ठ सल्लागार ज्येष्ठ मार्गदर्शक संजय जैन, अतुल बाफना, महावीर बाफना आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

