आरोपीकडून गावठी पिस्टलसह मुद्देमाल जप्त
धुळे: साक्री शिवारातील मलांजन येथे शेतातुन शक्तीमान कंपनीचे रोटावेटर (शेतीचे अवजार) असे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले बाबतच्या तक्रारीवरुन साक्री पोलीस स्टेशन येथे रोजी गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, धुळे समांतर तपास करीत असतांना दि.08 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त
गोपनिय माहितीचे आधारे पेरेजपुर ता. साक्री शिवारातील पेरेजपुर नाल्या जवळुन (1) सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावीत वय-34 रा. साबरट पोस्ट कोळदा ता. नवापुर जि. नंदुरबार व (2) प्रभु होडया गावीत वय-31 रा.उचीशेवडी ता. नवापुर जि. नंदुरबार अशांना ताब्यात घेतले. दोघा इसमांना विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून, गुन्हयातील चोरी केलेले शेतीचे अवजार व त्यांचे ताब्यात १) ३०,०००/- गावठी बनावट पिस्तूल 2) 1000/-रु.कि.चे एक जिवंत काडतुस 3) 500000,/-रु.कि.चे एक स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे आरटीओ पासिंग नंबर नसलेले ट्रॅक्टर जु.वा.कि.अं4) 100000/-रु.कि.चे एक केशरी रंगाचे शक्तीमान कंपनीचे रोटाव्हेटर 5) 100000/-रु.कि.ची रॉयल इनफिल्ड बुलेट ६) ८०,०००/-रु.कि.ची हिरो कंपनीची काळया रंगाची यूनिकॉर्न असा एकुण :-8,11,000/- रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशा प्रकारे (1) सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावीत वय-34 रा. सावरट पोस्ट कोळदा ता. नवापुर जि. नंदुरबार व (2) प्रभु होडया गावीत वय-31 रा.उचीशेवडी ता. नवापुर जि. नंदुरबार अशांना ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयात निष्पन्न करुन, एकुण 8,11,000/- रु.किं. चा मुद्देमाल हस्तगत करुन साक्री पोलीस ठाणे भाग-5 गु.र.नं. 17/2023 भादवि क.379 हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.आरोपी (1) सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावीत व (2) प्रभु होडया गावीत यांचे विरुध्द यापुर्वी असंख्य पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि.जयेश खलाणे, अमित माळी, संजय पाटील,रामलाल सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, तुषार सुर्यवंशी, देवेंद्र ठाकुर,शिंदे, सुनिल पाटील, अमोल जाधव, राजीव गिते, मयुर चौधरी, नारायण चव्हाण अशांनी केली आहे.

