जिल्हा क्रीडा संकुलात भीम केसरी कुस्ती स्पर्धा सुरू
धुळे: जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ धुळे व धुळे तालुका तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील इंदोर हॉलमध्ये भीम केसरी कुस्ती स्पर्धेला दिनांक पाच एप्रिल रोजी सुरुवात झाली.
राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान योगेश पगारे यांच्या पुढाकाराने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 6 एप्रिल रोजी या कुस्ती स्पर्धेचा समारोप होणार आहे. एकनाथ विजय व्यायाम शाळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय व्यायाम शाळा यांच्यावतीने या कुस्ती स्पर्धेचे संयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे 200 कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. दरम्यान विविध मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. याप्रसंगी पैलवान रवींद्र आघाव, आकाश परदेशी, सुहास आंपळकर, मुरलीधर लोकरे, सुनील चौधरी, लाला चौधरी, धुळे जिल्हा मराठी मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड, आकाश सोनवणे, दीपक शिंदे आधी मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. कुस्ती स्पर्धेतील विविध वयोगटातील विजेत्या कुस्तीपटूल गदा आणि रोख रक्कम तसेच उपविजेतांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. सहा एप्रिल रोजी कुस्ती स्पर्धेचा समारोप होणार आहे.

