एकाच नावाच्या व्यक्तीने कमीत कमी पाच ते सहा अश्या 27 हजार बोगस मतदारांनी केले मतदान अनिल गोटे यांचा आरोप
धुळे : विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल 45 हजार बोगस मतदारांनी मतदान केले असून 27 हजार मतदान एकाच नावाच्या कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सहा अशा सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादी आपल्या हाती लागल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे… याबाबत तात्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही तसेच बोगस मतदान करून घेण्यासाठी बीएलओ यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांची आगावू रक्कम देण्यात आल्याचा आरोप देखील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.












