धुळे : संघमा चौक जवळील देवचंद नगर येथे नगर सेवक बागुल यांची ऋषिकेश चव्हाण नामक मुलासोबत मारहाण प्रकार समोर आला आहे ह्या ठिकाणी ऋषिकेश चव्हाण हा हिरे मेडिकल हॉस्पिटल येथे भरती असून त्याच्यावर उपचार सुरु आहे त्या ठिकाणी त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना असा आरोप केला आहे की
प्रशांत बागुल व त्यांच्या सोबत असलेले मुलांनी शनिवारी रात्री 8 वाजता संघमा चौक येथे जुन्या वादावरून अचानक हल्ला केला आहे व राहत्या घरी येऊन दगड फेक करून मोठी तोडफोड केली आहे त्यात चव्हाण यांची पत्नी हिला देखील दुखापण केल्याचा आरोप केला आहे व मोटरसायकल देखील तोडफोड केल्याचा आरोप आहे. ऋषिकेश हा 3 दिवसापासून शासकीय रुग्णालयात दाखल असून त्या ठिकाणी पोलिसांनी कुठलाही जबाब घेतला नाही असा आरोप देखील करण्यात आला आहे.












