देवचंद नगर येथे शनिवारी झालेल्या मारहाण प्रकरणांमध्ये माजी नगरसेवक प्रशांत बागुल यांनी देखील त्यांची बाजू मांडली आहे त्यांनी या ठिकाणी असे सांगितले आहे की ऋषिकेश (बंटी) नावाचा मुलगा संगमा चौकात लघु शंका करत असताना त्या ठिकाणी अनेक महिला मुली जात होत्या व तो दारूच्या नशेत होता व अशी माहिती दिली की बागुल व त्यांच्या आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला
परंतु त्यांनी वादविवाद केला व बागुल त्यांच्या आईवर दगडाने हल्ला करून जखमी केले आहे असा आरोप प्रशांत बागुल यांनी केला आहे व सांगितले की हा येत्या निवडणुकीसाठी असणारा राजकीय स्टंट असू शकतो त्याने स्वतःहून त्याच्या दारात दगडफेक करून नुकसान केले आहे असा देखील आरोप केला आहे. या ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलताना परिसरातील काही नागरिक ऋषिकेश चव्हाण (बंटी ) याच्या विरुद्ध माजी नगरसेवक प्रशांत बागुल यांच्या घराजवळ गोळा झाले व त्यांनी देखील त्याच्याविरुद्ध काही प्रतिक्रिया दिल्या आहेत या ठिकाणी सांगितले की बंटी नावाचा मुलगा हा पूर्ण परिसरात नेहमी धुमाकूळ घालत असतो त्याच्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना त्रास आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे.












