महामार्ग प्रशासना विरोधात मोराने ग्रामस्थ आक्रमक…
सुरत नागपूर महामार्गा गेल्या वर्षभरापासून वादाच्या भावऱ्यात सापडला आहे.. या महामार्गावर काही महिन्यांपूर्वीच कुसुंबे गावाजवळ मला मोठा खड्डा पडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी काही सामाजिक संघटनांनी आक्रमक आंदोलन उभे करून महामार्ग प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.. मात्र तोच आता दुसरीकडे मोराणे गावाजवळ तब्बल दहा फूट लांबीचा खड्डा अचानक पडल्याने मोराने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहे…
सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या मोराणे गावाजवळ असलेल्या उड्डाणपुलावर अचानक भले मोठे भागदाड खाली पडून आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली यावेळी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना यावेळी मोठा खड्डा पाहायला मिळाला… या संदर्भात त्यांनी तात्काळ महामार्ग प्रशासनाला कळवून देखील महामार्ग प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नसल्यामुळे पोलिसांना या संदर्भातली माहिती देत संबंधित महामार्गावरील वाहतूक तात्पुरता वळवण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर धिवरे यांनी यावेळी दिली…

सुरत नागपूर महामार्ग प्रशासन महामार्गावरील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सुरत नागपूर या महामार्गाचे अद्याप पर्यंत लोकार्पण झालेले नाही आणि या महामार्गावरील अजून अनेक कामे हे पूर्ण झाले नसून हा महामार्ग वाहतुकीसाठी का खुला करण्यात आला असल्याचा सवाल ग्रामस्थ विचारात आहे.. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने या गंभीर समस्या कडे तात्काळ लक्ष द्यावे आणि संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अन्यथा संपूर्ण ग्रामस्थ महामार्गावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे













