धुळे – आयडीटी शिक्षण संस्थेच्या धुळे शाखेतील आकार २.० या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन आणि उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट श्री. श्रीप्रकाश भंडारी सर, आर्किटेक्ट योगेश ठाकरे सर, आयडीचे श्री. स्वप्निल बागूल सर आणि आयडीटीचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
या ठिकाणी संस्थापक संचालकांनी धुळेकर नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे की ज्याप्रकारे पुणे मुंबई मोठ्या सिटीत डिझायनिंग वर्क पाहायला मिळते त्याच प्रकारे या आय.डी.टी शिक्षण शिक्षण संस्था धुळे ब्रांच येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी अशीच मोठी कला सादर केली आहे या ठिकाणी खरंच कौतुक करण्यासारखं काम केले आहे इंटरियर व फॅशन डिझायनिंग हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू आहे त्यांच्या काळात मावळ्यांचा पेहराव व महिलांचा पेहराव किती आकर्षित असायचा त्याचप्रकारे या काळात देखील इंटरियर व फॅशन डिझायनिंग किती महत्त्वाचं आहे व त्यासाठी आय.डी.टी धुळे ब्रांच हे तरुण पिढीला सुंदर कलाकृतीचे शिक्षण देऊन त्यांचं भविष्य घडवत आहेत हे

या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक व संचालक श्री. महेंद्र शेवाळे सर आणि संचालिका श्रीमती स्नेहल शेवाळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झाले. तसेच, आयडीटी धुळे शाखेच्या सेंटर हेड आणि प्राचार्या रेखा मॅडम, इंटीरियर विभाग प्रमुख वरुण सर, आणि इंटीरियर व फॅशन शाखेतील वैष्णवी मॅडम, मानसी मॅडम तसेच इतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही प्रदर्शनी यशस्वी केली.

ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असून, धुळे येथील डीएसके टॉवर, वडिबोकऱ रोड, चौथा मजला येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो की, वेळ काढून आकार २.० प्रदर्शनीला भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कार्य पाहून त्यांचे कौतुक नक्की होईल












