रणजित राजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली व आरोप केले कि धुळे शहर अवैद्यधंद्याची राजधानी बनली, धुळे शहरांमध्ये एकूण 367 ठिकाणी अवैद्य, दोन नंबरचे धंदे सुरू . धुळे शहरातील दोन नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे, अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन केली
ह्या ठिकाणी असा आरोप केला कि धुळे शहरांमध्ये दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अवैध दोन नंबर धंद्यामुळे शहरातील वातावरण खराव होत आहे. धुळे शहरातील तणाव, मारामाऱ्या, खून, दरोडे, चोऱ्या यांच्या कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत. आज धुळे शहरांमध्य विविध प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा, सट्टापेढी, मटका, चक्री, अवैद्य गॅस, गांजा, कोरेक्स बॉटल, सोरट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, अवैध जनावर वाहतूक, वाळू तस्करी, डुबलीकेट डांबर, केमिकल, टायगर, काला पिला, अवैद्य जनावरे वाहतूक, फोर पीस, चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रबिंग अशा विविध स्वरूपाचे दोन नंबरचे अवैध धंदे धुळे शहरांमध्ये सुरू आहेत. आमच्या माहितीनुसार धुळे शहरांमध्ये जवळपास विविध प्रकारचे 367 ठिकाणी दोन नंबरचे अवैध धंदे सुरू आहे. काही ठिकाणच्या दोन नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळालेले आहे. पोलीस विभागातील काही अधिकारी, कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देत आहे. यामुळे धुळे शहराचे वातावरण कुलुशीत झालेले आहे. गोरगरीब, कष्टकरी जनतेकडून अवैद्य धंद्यांच्या मार्फत करोड रुपये कमवून काही अधिकारी, कर्मचारी गब्बर झाले आहेत. या सर्व गोष्टीमुळे धुळे शहरांमध्ये गुंडगिरी, दादागिरी, चौकाचौकात टपोरी गुंड यांचे प्रमाण वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठी कट्टा पिस्तूल, तलवारी, चॅपर, फायटर, बेकायदेशीर हत्यार दिसून येते. त्यांना कोणाचे भय राहिलेले नाही. धुळ्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडे हत्यारे दिसून येतात, ही धोकादायक बाब आहे. या दोन नंबरच्या अवैद्य धंद्यांना जनता कंटाळली आहे. या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घावरत आहेत. धुळे शहराचा विकास खुंटलेला आहे. आणि याला सर्वस्वी जवाबदार अवैद्य धंदे आहेत.

व अशी मागणी केली तरी पोलीस प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून धुळे शहरातील अवैद्य दोन नंबरचे धंदे त्वरित बंद करावे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून गावठी कट्टा, पिस्तुल, तलवारी, चंपर, फायटर, बेकायदेशीर हत्यारे जमा करावीत. दिनांक 5 में 2025 रोजी रणजीत राजे भोसले यांनी लेखी पत्र देऊन माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली होती तसेच जून महिन्यामध्ये पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, अवैद्य दोन नंबरच्या धंद्यांवर कारवाई आलो नाही तर लवकरच आम्ही शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्रीची भेट घेणार आहोत. व त्यांना सर्व पुराचे सादर करणार आहोत. अशी माहिती रणजीत राजे भोसले यांनी दिली.
