धुळे : गुन्हेंगारी क्षेत्रातील मागील 10 वर्षांपासुन गुन्हें करणाऱ्या फाईट ग्रुपचा प्रमुख व गुन्हयात सामील सदस्यांवर आगामी गणेश उत्सव, नवरात्री व स्थानिक स्वराज्य संस्था (धुळे म.न.पा.) निवडणुकीचे अनुषांगाने गुन्हेगार सवयीचे लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी धुळे शहरातील गायकवाड चौक येथे राहणारे फिर्यादी- श्री. सिध्दार्थ राजु देवरे हे त्यांचे घरी हजर असतांना त्याच परिसरात राहणारे फाईट ग्रुप स्वयंघोषीत प्रमुख १) ज्ञानसागर उर्फ नाना विठठल साळवे व त्याचे साथीदार नामे २) विजय श्रीराम अहिरे, ३) सुमित सुभाष शिंदे, ४) अमर धर्मा अहिरे, ५) योगेश सुनिल सुर्यवंशी, ६) दत्तात्रय बाळू उलभगत (शेवतकर), ७) वसीम खान अयुब खान पठाण व ८) मोसीन सलीम शेख अशांनी सिध्दार्थ राजु देवरे यास काय रे भाडया छिनालच्या मातून गेला काय अशी शिवीगाळ करुन जमिनीवर खाली ढकलुन दिले. त्यानंतर नाना साळवे याने याला जिवंत सोडू नका अशी त्याचे साथीदारांना चिथावणी देवुन, सिध्दार्थ देवरे यास त्याचे हातातील हत्याराने डावे पायावर वार करुन गंभीर जखमी केले. तेव्हा सिध्दार्थ देवरे यांची गरोदर पत्नी अंजली व आई- बेबीबाई देवरे व त्यांचे काका- दिगंबर बाबूराव देवरे हे सिध्दार्थ देवरे यास वाचविण्यासाठी आडवे झाले असतांना त्यांना देखील लाथा, बूक्कीने मारहाण करुन दिगंबर देवरे यास हत्याराने डोक्यावर मागील बाजूस वार करुन गंभीर जखमी केले. याबाबत सिध्दार्थ राजू देवरे यांचे तक्रारीवरुन आझाद नगर पोलिस ठाणे, धुळे येथे अपराध क्रमांक १७७/२०२५ भा.न्या.स. कलम १०९ (१), ११५(२), ३३३, ११८(१), ३५१ (२) (३), ३५२, १८९ (२) (४), १९१ (२), (३) सह म. पोलीस अधि. कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक, निवृत्ती पवार यांनी व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर यांनी विजय शिरसाठ व संदीप सोनवणे अशांचे मदतीने नाना साळवे वगैरे लोकांविरुध्द आर्थिक गैरलाभासह इतर लाभ संपादन करण्याचे उद्देशाने दरोडा घालेण, खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचा-यांना त्यांचे कर्तव्य करण्यापासुन धाकाने परावृत्त करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन दशहत निर्माण करणे, विनयभंग करणे, शासनाच्या आदेशाचे उल्लघंन करणे, सार्वजनिक ठिकाणी शस्त्राचा धाक दाखवुन लोकांमध्ये दहशत निर्माणे असे मागील 10 वर्षापासुन त्याचेविरुध्द आझाद नगर पोलिस ठाणे, धुळे शहर चाळीसगांव रोड पोलिस ठाणे व देवपुर पोलिस ठाणे तसेच पिंपळनेर पोलिस स्टेशन अशा विविध पोलिस ठाणे अंतर्गत नियमीत गुन्हेगारी क्षेत्रात सातत्याने सक्रीय असल्याबाबत पुरावे गोळा केले.त्यानंतर मा. पोलिस अधीक्षक, श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक, श्री. अजय देवरे व मा. राजकुमार उपासे, उपविभागीय पोलिस अधिकारी, धुळे शहर उपविभाग, धुळे यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक, निवृत्ती पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर यांनी पोहवा/विजय शिरसाठ व पोकॉ संदीप सोनवणे अशांचे मदतीने नमुद आरोपींचा गुन्हेंगारी क्षेत्रातील मागील 10 वर्षांचा पुर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इतिहास पाहुन, यापुढे धुळे शहरात कोणीही कोणत्याही प्रकारे गुन्हेगार व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करुन नये. यासाठी फाईट ग्रुपचा प्रमुख व गुन्हयात सामील सदस्यांवर आगामी गणेश उत्सव, नवरात्री व स्थानिक स्वराज्य संस्था (धुळे म.न.पा.) निवडणुकीचे अनुषांगाने भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 111 अन्वये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
