धुळे : शिरपूर तालुक्यात आठ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने प्रत्येकाच्या मनात आक्रोश सुरु आहे त्या संदर्भात आज शिरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर शांततेत मोर्चा काढण्यात आला व संविधानिक मार्गाने पद्धतीने मोर्चेचा समारोप झाला परंतु त्याच ठिकाणी मोर्चा संपल्यावर काही समाजकंठकांनी गुजराथी कॉम्प्लेक्स परिसर अर्धा तास वाहतुक ठप्प करून नागरिकांना त्रास होईल अशी वर्तणूक करत
व त्या आरोपीला जागेवरच फाशी देण्याची मागणी करू लागले पोलीस अधिकारी त्यांना समजवत असतांना कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद घालून पोलीस अधिकारी सहित कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न देखील केला व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना धारदार शस्त्राने मागून वार केला आहे त्याच ठिकाणी पोलिसांनी आपला कायद्याचा वापर करीत समाजकंटकांना पळवून लावले त्यानंतर शांततेचे वातावरण झाले असून या संदर्भात पोलीस निरीक्षक हिरे यांनी आवाहन केले आहे की त्या संदर्भात कुठल्याच प्रकारे अफवा पसरवू नये व कायदा सुव्यवस्था बिघडेल अशाप्रकारे कोणीच वाईट कृत्य करू नये असे आवाहन केले आहे.

