धुळे : अनेक महिन्यापासून थकीत 1200 कोटी मिळत नसल्याने धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वारंवार निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत असतांना व आज पत्रकार परिषद घेऊन येत्या 15 ऑगस्ट रोजी सामोहिक आत्मदहन करत असल्याचे ह्या ठिकाणी सांगण्यात आले.

या ठिकाणी असे सांगितले की आम्ही धुळे जिल्हयातील विविध विभागात शासकीय कामे करीत आहोत. पण जवळपास मागील एक वर्षा पासुन शासन देयकेच देत नाही ह्या आर्थिक समस्यांशी दोन हात करत अयशस्वी ठरल्याने आमच्यातला एक तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंता कै. हर्षल पाटील रा. तांदुळवाडी जि. सातारा याला शेवटी आत्महत्या करावी लागली. त्याच्या पश्च्यात वृद्ध आईवडील, ५ वर्षाची चिमुकली मुलगी. तरुण विधवा पत्नी व इतर कुंटूबीय सदस्य अजुनही अनेक समस्यांना तोंड देत कसेतरी आपले आयुष्य काढत आहे.
आमचे शासनाकडे शेकडो कोटी रुपये थकबाकी आहेत. पण शासन साधा एक रुपया सुद्धा देत नाही आणि ज्यांचे आमच्याकडे घेणे बाकी आहेत. त्या व्यक्ती, व्यापारी, बँका, मजुर, मटेरियल सप्लायर्स, अशा अनेक प्रतिष्ठाणे वांरवार सारखा तगादा लावित आहे बँका वाहने व प्रॉपर्टी जप्त करीत आहेत. cibil खराब होत आहे. बाजारात असलेली संपत आहे व इतर खाजगी व्यापारी मंडळी सदस्य सुद्धा घाबरून गेले आहेत असे देखील सांगितले.एकीकडे शासन देयके देत नाही दुसरी कडे घेणार थांबायला तयार नाही. अशा विवचनेत ठेकेदारांनी करावे तरी काय? यावर कडी म्हणून काय शासन पेमेंट देत नाही म्हणून मुख्य अभियंत्यांनी कामांना सरसकट मुदत वाढ दिली पण मुख्य अभियंत्याच्या हाताखाली कामे करणारे ठेकेदारांना धुळे जि. कॉट्रक्टर असोसिएशन धुळे व महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ व बिल्डर असोसिएशन धुळे यांनी सतत पाठपुरावा करून उत्तरमहाराष्ट्रासाठी शासकीय कामांना सरसकट मुदतवाढ दिली. धुळे सा.बां. उत्तर विभागीय कार्यकारी अभियंता व सा. बां. विभाग धुळे कार्यकारी अभियंता कामे निविदेतील मुदतीत करत नाही म्हणून सदर ठेकेदारांना दंडाचा प्रस्ताव देत आहे. कामे करण्यास दबाव तंत्र वापरत आहे. अशा अनेक समस्यांना तोंड देत देत नाकी नऊ आले आहेत म्हणून येत्या १५ ऑगस्ट रोजी आम्ही पोलीस ग्राऊंडवर झेंडावदनाच्या आपल्या तिरंग्याला मान दिल्यानंतर अनेक ठेकेदार आत्मदहन करणार आहेत असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले.
