धुळे : हरियाणा येथून खाद्य तेलाच्या टँकमधून विदेशी दारूची तस्करी गुजरात राज्यात होणार आहे अशी बातमी पोलिसांना मिळाली त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक, श्री. श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व नरडाणा पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक तयार करुन नाकाबंदी कामी रवाना केले. गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मुंबई महामार्ग क्रमांक-3 वर आकांक्षा हॉटेल च्या पुढे नाकाबंदी दरम्यान गोपनीय बातमीतील टाटा कंपनीचे टँकर मिळून आले.
ह्या टँकर वरील चालक मोहनलाल पुरखाराम जाट, वय-25 वर्ष, रा.बरेवालातला, पो. सदर बाडमेर जि.बाडमेर (राजस्थान राज्य) यास टँकरमधील माला बाबत विचारपुस केली असता, चालकाने त्यात खाद्य तेल असल्याचे सांगीतले. चालकाचे बोलण्याचा संशय आल्याने व गोपनीय बातमीची खात्री करणेकरिता टँकरची पहाणी केली असता, टँकरच्या आतमध्ये लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते व त्यांचे झाकण नट बोल्टने फिट करुन वेल्डींग केलेले होते. पंचासमक्ष टँकरचे झाकण गॅस कटरने उघडुन पाहिले असता, त्यातील सहा कप्यांपैकी चार कप्यांमध्ये किंमती विदेशी दारु लपवून ठेवल्याचे दिसून आले. सदरची विदेशी दारू पुष्पा स्टाईलने खाद्य तेलाचे टँकरमधुन अवैध रित्या तस्करी उघड झाली, अंदाजे एक कोटीचा मुद्देमाल असून स्थानिक गुन्हे शाखा, धुळे कडुन जप्त करण्यात आली असून मोठी कारवाई आहे. त्याचेविरुध्द महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायदा अन्वये नरडाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर विदेशी दारुचा मुळ स्त्रोत व कोणाकडे माल विक्रीसाठी जात होता याचा तपास सुरु आहे.

सदर कामगिरी श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सपोनि.निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि. चेतन मुंडे, पोलीस अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, राहुल सानप, मयुर पाटील तसेच नरडाणा पोलीस ठाणेचे अंमलदार रविंद्र मोराणीस, ललित पाटील, राकेश शिरसाठ, योगेश गिते व मोरे यांनी केली आहे.

