धुळे : गेल्या कित्येक दिवसापासून शितल पाटील या महिलेची मुलगी घरातून गायब असल्याचे सांगत व नातलगांनीच अपहरण केल्याचा आरोप करत मुलगी न मिळाल्याने येत्या 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

शीतल पाटील यांनी काही महिन्यापूर्वी मुलगी शिरपूर पोलीस स्टेशन येथे मुलगी गहाळ झाल्याची तक्रार केली होती मुलगी नातलगाकडूनच गहाळ झाल्याचे समजल्याने त्यांनी अनेक आमदार, पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक यांच्या भेटी घेतल्या परंतु कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रभा परदेशी त्यांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचे ठरवले या ठिकाणी त्यांनी त्यांची व्यथा सांगितली कि माझी मुलगी हि गहाळ झाली आहे आहे तीच वय 17 असून तिने अद्याप माझ्याशी कुठलाच संपर्क केला नाही व तिचे सर्व कागदपत्र व कपडे घरी असल्याने हि खूप चिंताजनक असल्याचे सांगितले त्या ठिकाणी मुलीच्या आई ने असे सांगितले कि मी एक गरीब महिला नवरा दारूच्या आहारी आहेत नातेवाईक कोणीच मदत करायला तयार नाही असे सगतांना माझा आत्मदहन हाच शेवटचा पर्याय आहे असे सांगत त्यांचे अश्रू अनावरण झाले मुलगी वयात नसतांना पोलीस तिचा तपास का करत नाही असा प्रश्न देखील उपस्तित केला आहे व मुलगी न मिळाल्याने येत्या 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मदहन करणार असल्याचे पत्रकार परिषद येथे सांगितले.
