अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी नाशवंत वस्तूं न आणता वही पेन आणून अभिवादन करावे; आयोजकांचे आवाहन…
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असा संदेश देणाऱ्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळ्यातील समस्त आंबेडकरी युवकांच्या वतीने “एक वही एक पेन” या उपक्रमाचे सालाबादप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले असून धुळेकर नागरिकांनी आणि आंबेडकरी अनुयायी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे…
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दिनांक 06 डिसेंबर रोजी संपन्न होणार असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी गर्दी करीत असतात मात्र बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशवंत असणाऱ्या वस्तू न आणता एक वही एक पेन या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोहोचावेत या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून धुळ्यातील आंबेडकरी युवकांच्या वतीने एक वही एक पेन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
सालाबादा प्रमाणे यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एक वही एक पेन हा उपक्रम संपन्न होणार आहे या उपक्रमात धुळेकर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोहोचावेत या उद्देशाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आंबेडकरी युवकांच्या वतीने करण्यात आले आहे. महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व विशद केले असून शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते प्राशन करणारा अन्याय करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध विरुद्ध आवाज उठविण्याचे काम करीत असतो असा संदेश महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवन चरित्रातून दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोहोचावेत या उद्देशाने संपन्न होणार्या या उपक्रमात धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..













