विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांच्या विविध संघटनांतर्फे एकत्रितरीत्या धुळे शहरात दिनांक पाच डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा द्वारे हजारो शिक्षक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. कल्याण भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा जेलरोड मार्गे क्यूमन क्लब येथे पोहोचल्यानंतर मोर्चाचा सभेत रूपांतर झालं. टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करा. जुनी पेन्शन लागू करा.
शिक्षण सेवक पद रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर समन्वय समितीचे पदाधिकारी बापू पारधी, एकनाथ भामरे, संजय पोतदार, गमन पाटील, शरद पाटील, योगेश धात्रक, चंद्रकांत सत्तेसा, धीरज परदेशी, रवींद्र पाटील, आर व्ही पाटील, संजय पवार, उदय तोरवणे, डॉक्टर संजय पाटील, ज्ञानेश्वर कखर, भटू पाटील, तुकाराम बहिरम, राजेंद्र भामरे, कुरेशी अमिन सर, भूपेश वाघ, डॉक्टर आनंद पवार, यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक बांधव आजारांच्या संख्येने सहभागी झाले होते.












