धुळे : मोरणे येथील सैनिकी विद्यालय येथे एका विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण पोलीस देखील एका चोराला अशाप्रकारे मारत नाही परंतु या चिमुकला नाजूक मुलाला संपूर्ण शरीरावर जखम व हात निकामी करेपर्यंत मारले आहे विद्यार्थ्याचे वडील हे शिवसेना भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आहेत त्यामुळे हे प्रकरण मिटू शकत नाही व कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सैनिकी शाळेतील शिक्षकाने शुल्लक कारणावरून महेंद्र जोशी नामक विद्यार्थ्याला मोठ्या काठीने अमानुषपणे मारहाण केली आहे सदर विद्यार्थ्याला संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या असून व एक हात निकामी झाला आहे विद्यार्थ्याकडून अशी माहिती मिळाली की वर्ग सुरू असताना पुढील बेंचवर बसलेल्या मुलाने शिक्षकाजवळ पुस्तक फेकले व तो मुलगा तिथून पसार झाला परंतु महेंद्र जोशी याचा काही संबंध नसताना शिक्षकांनी कुठलीही शहानिशा न करता अमानुषपणे मारहाण झाली आहे या शाळेत असे अनेक प्रकार घडत असतात परंतु हा प्रकार गंभीर असून शिक्षकावर त्वरित कारवाईची मागणी करण्यात येत आहे.















