धुळे : काही दिवसापूर्वी धुळे शहरातील उत्कर्ष कॉलनी या परिसरात घरफोडी झाल्याने शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार दाखल होती व धुळे शहर पोलीस स्टेशनचे डी. बी. पथकाकडून मुद्देमाल सहित गुन्हेगाराला ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

फिर्यादी श्रीमती रंजना रमेश यांनी फिर्याद दिली की,धुळे शहरातील उत्कर्ष कॉलनी साक्री रोड त्रिमुर्ती मंदिरा शेजारी असलेले राहत्या घरातील बाथरूमची खिडकी तोडुन आत मध्ये प्रवेश करुन घरातील मधल्या खोलीत असलेल्या कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले 35,000 रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन धुळे शहर पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांतजी धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे, यांच्या मार्गदर्शन सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांनी तात्काळ गोपनीय बातमीदाराना सतर्क करने आपले तपासचक्र फिरविले सदर गुन्हयातील आरोपीताचा व मालमत्तेचा शोध घेत असताना पोनि दिपक पाटील यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, धुळे शहरातील भिमनगर येथे राहणारा सिध्दार्थ सोनवणे हा सदर गुन्हयात असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने तात्काळ गुन्हे शोध पथकातील अमलदार यांना सदर इसमाचा शोध घेणे करीता रवाना केले. शोध पथकातील अमलदारांनी सदर इसमास त्याच्या वडीलांसमक्ष नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सिध्दार्थ दिपक सोनवणे वय 14 वर्षे, रा. पर नं 213 प्रबुध्द चौक, भिम नगर साक्री रोड धुळे असे सागितले त्यास विश्वसात येवुन अधिक विचारपुर केली असता त्याने दिनांक 01/11/2025 रोजी दुपारी 03/00 वा. चे सुमारास त्याने व त्याचा साथीदार लाखन अशांनी मिळून सदरची परफोडी केल्याचे कबुल केले. तसेच गुन्हयातील मालापैकी 500/-रुपये किंमतीच्या एकुण 30 नोटा असे एकुण 15000/- रुपये रोख विधीसंघर्षित बालकाकडुन हस्तगत करून सदर विधी संघर्षग्रस्त बालकास दिनांक 14/11/2025 रोजी मा.प्रमुख बाल न्यायदंडाधिकारी सो. बाल न्यायालय धुळे यांचे आदेशाने मुलाचे निरीक्षण गृह व बालगृह धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.
तसेच दिनांक 21 रोजी गुन्हे शोध पथकातील अंमलदार सदर गुन्हयातील आरोपी लाखन याचा शोध घेत असतांना सदर गुन्हयातील आरोपी लाखन हा धुळे शहरातील साक्री रोड परीसरात मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन त्यांने त्यांचे नाव उमेश उर्फ लाखन दाजमल सोनवणे वय 22 वर्षे रा. शनिनगर साक्री रोड धुळे असे सांगितले त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा त्यांचा साथीदार (विधी संघर्षग्रस्त बालक), भिम नगर साक्री रोड धुळे यांच्या साथीने केल्याचे कबुल केले. सदर आरोपी याचे कडुन गुन्हयातीत मुद्देमाल 20,000/- रोख त्यात 500/- रुपये किंमतीच्या एकुण 40 नोटा व सोने चांदीचे दागिने असे हस्तगत करण्यात आले आहे.
एकूण 57,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल हास्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांतजी धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डि. बी. पथकाचे पोहेको कुंदन पटाईत, पोको महेश मोरे, पोको तुषार पारधी, पोकी प्रशांत नाथजोगी, पोकों/ सुदर्शन मोरे, पोको धम्मपाल वाघ, पोकों/हिमांशु ठाकुर, मपोकों रोहिणी पवार पोकी अमित रनमळे, पोको/दिपक जगताप, पोको/ योगेश ठाकुर, चापोहेको/ हनिफखी पठाण, चापोको/शाहिद शेख अशांनी मिळून केलेली आहे.












