धुळे : घोरफोडी करणारा अट्टल चोरटा चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केले आहे सदर आरोपी चाळीसगाव रोड पोलीस हद्दीत घरफोडी केल्याने त्याचा शोध घेत असताना त्याला ताब्यात घेतले आहे या आरोपीवर धुळे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन येथे 15 पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत.
फिर्यादी राशीद हुसेन शाहदत हुसेन अन्सारी यांनी दिनांक 17 रोजी फिर्याद दिली की, दिनांक 14 रोजी रात्री 11:00 वा. त्यांचे मोठ्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी भिवंडी जि. ठाणे येथे परिवारासह घराला कुलूप लावुन गेले होते घरी परत आले असता त्यांचे राहते घराचा पुढील दरवाज्याचा कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांनी घरात प्रवेश करुन बघितले असता त्यांचे रुममधिल सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचे गोदरेज कपाटातील लॉकर चेक केले असता त्यात ठेवलेली त्यांची 20,000/- रुपये रोख रक्कम त्यांना दिसुन आली नाही म्हणून त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटय इसमाने त्यांचे राहते घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडुन अनधिकृतपणे आत प्रवेश करुन कपाटातील रोख रक्कम 20,000/- रुपये चोरुन नेली म्हणून त्यांनी अज्ञात चोरटयाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगाव रोड पोस्टेला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल केल्यानंतर पोनि. सुरेशकुमार घुसर यांनी शोध पथकास सुचना देवुन तात्काळ नमुद गुन्हा उघडकिस आणुन घरफोडी करणाऱ्या चोरास अटक करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत घटना घडलेल्या परिसरातील दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक संशयीत इसम रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरतांना दिसुन आला. त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता तो पोलीस ठाणे अभिलेखावरील घरफोडी करणारा आरोपी फैजान ऊर्फ मुजम्मील हुसेन अन्सारी याच्या सारखी शरीरयष्टी व रचना असलेला इसम दिसुन आला. त्यामुळे अभिलेखावरील सराईत घरफोडी करणारा अटटल चोर फैजान ऊर्फ मुजम्मील हुसेन अन्सारी यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याचे कडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने तपासात सहकार्य केले नाही. तेव्हा त्यास पोलीस खाक्या दाखवताच सदर गुन्हयाची कबुली दिली. त्यानुसार त्यास नमुद गुन्हयात 19/11/2025 रोजी अटक करुन त्याने सदर गुन्हयात घर फोडी करुन चोरुन नेलेली रोख रक्कम 20,000/-रुपये काढुन दिल्याने ती जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलीस ठाणे अभिलेखावरील घरफोडी करणारा अटटल चोर आरोपी फैजान ऊर्फ मुजम्मील हुसेन अन्सारी, वय 20 वर्षे, राह. इसाक मशीदजवळ, हाजी नगर, धुळे यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली रोख रक्कम हस्तगत करुन चाळीसगाव रोड पोस्टेने चांगली कामगिरी केली आहे.

नमुद गुन्हेगार हा घरुफोडी / चोरी चा अट्टल गुन्हेगार असुन आज पावेतो त्याचेविरुध्द चाळीसगाव रोड, आझाद नगर, पश्चिम देवपूर व जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात 17 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे, धुळे शहर विभाग, धुळे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पोनि/सुरेशकुमार घुसर, सपोनि गणेश पवार, पोउनि हरिश्चंद्र पाटील,. प्रदिप पाटील,मनोज पाटील, विनोद पाठक,निलेश चव्हाण, सचिन पाटील, शोएब बेग, इंद्रजित वैराट,सिराज खाटीक, सारंग शिंदे,अभिलेश बोरसे अशांनी केलेली आहे.













