धुळे : काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य व्हायरल झाले की तळागळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणार का ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्ते दीर्घकाळ काम करतात त्यांची निवडणूक लढवावी असे वक्तव्य मुख्यमंत्री यांनी केले आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रात असा प्रकार पाहायला मिळत नाही त्या उलट भारतीय जनता पक्ष यांचे आमदार मंत्री खासदार यांचेच घराण्याचे व्यक्ती त्यांनी उभे केले आहेत असाच प्रकार धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेत घडला आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांच्याच घरातील व्यक्ती स्वतः त्यांच्या मातोश्री त्यांनी अर्ज भरला होता व आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या पहिल्या बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

एकीकडे मुख्यमंत्री कार्यकर्त्यांसाठी आदेश करता आणि त्यांचेच आमदार घराणेशाही पाळत आहे त्यामुळे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणार का यात काही शंकाच नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे सांगायचे की ही निवडणूक तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आहे अनेकदा म्हटले जायचे परंतु ह्या आशेवर त्यांचेच नेते पाणी फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नगरपरिषद,नगरपंचायत अनेक उमेदवार मंत्री संत्री आजी माजी आमदार खासदारांचे नातेवाईक दिसतात त्यामुळे आयुष्यभर कार्यकर्त्यांनी शतरंज्याच उचलायचा का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय.
जामनेर येथे गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन, मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ अल्हाद कालोदि, राज्यमंत्री नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक,मंत्री फुंडकर यांच्या वहिनी अर्पणा फुंडकर, माजी सभापती निंबाळकर यांचा मुलगा अनिकेत निंबाळकर, मंत्री सावकार यांची पत्नी रजनी सावकारी,किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील, संजय गायकवाड यांची पत्नी पूजा गायकवाड, मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण, सत्यजित तांबे यांची पत्नी मैथली तांबे, माजी खासदार निंबाळकर यांचे भाऊ रमेश सिंग निंबाळकर अशा अनेक जागा ह्या घराणेशाही च्या उभ्या केल्या आहेत.













