धुळे : पोलीस निरीक्षक, श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गोपनिय बातमी मिळाली की, रविंद्र गणेशा पावरा याने चिलारे गावाचे शिवारात टिटवा गावाचे रोडावरील शेतातील घरात गांजा अवैधरित्या साठा करुन विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगत असल्याची माहिती मिळून आली होती. त्यानुसार पो.निरी. श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार यांचे वेगवेगळे दोन पथक तयार करुन छाप्याचे नियोजन केले. तसेच छापा कारवाईसाठी पथकास आवश्यक मार्गदर्शन करुन कारवाईसाठी रवाना झाले होते.
सदर पथकाने चिलारे गावाचे शिवारात टिटवा गावाचे रोडावरील शेताजवळ सापळा लावून बातमीची खात्री झाल्याने शासकीय पंच, पोनि. श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी राजपत्रित अधिकारी आणि छापा अधिकारी म्हणून मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा अंमली पदार्थ अवैधरित्त्या साठा करून 42,35,000 रुपये किमतीचा 605 किलो ठेवलेला गांजा जप्त करण्यात आलेला आहे.

गांजा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोहवा. आरिफ रमजान पठाण, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांचे तक्रारी वरुन आरोपी रविंद्र गणेशा पावरा, रा. चिलारे, ता. शिरपूर, जि. धुळे यांचे विरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 115/2025 गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20(ब) (ii) (क), 22(क) व 29 (NDPS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कामगिरी मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, श्रीराम पवार, पोउनि, अमित माळी, स्था. गु. शा. धुळे पोनि, जयपाल हिरे, पोउनि. सुनिल वसावे, शिरपूर तालुका पो. ठाणे, तसेच पोहवा., आरीफ पठाण, पोहवा, पवन गवळी, पोहवा. पंकज खैरमोडे, पोकों, मयूर पाटील, योगेश जगताप, जगदीश सुर्यवंशी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, चालक पोकों, गिते, गुलाब पाटील सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, धुळे तसेच पोहवा. राजू ढिसले, पोकों, प्रकाश भिल, पोकों. ग्यानसिंग पावरा, पोकों, रोहिदास पावरा, सर्व नेमणूक शिरपूर तालुका पोलीस स्टेशन अशांनी संयुक्तिक कामगिरी केली आहे.













