धुळे : सध्या पोलिसांचा विषय केला कि अनेक प्रकार समोर येतात पैसे मागतांना अनेक व्हिडीओ समोर येतात त्याच प्रकारे धुळ्यात असाच प्रकार सुरु तर नाही ना…? महसूल मंत्री कालच धुळ्यात पत्रकार परिषद येथे सांगून गेलेत प्रत्येक बातमीची दखल घेऊ मग ह्या बातमी ची दखल घेतील का…?
धुळे शहरात वाहतूक कोंडी हा प्रश्न नवीन नाही अनेक वर्षानुवर्ष होत आहेत तरी देखील वाहतुकीचा प्रश्न सुरळीत होत नाही एकाच ठिकाणी असंख्य वाहतूक पोलीस कर्मचारी का थांबतात ज्या ठिकाणी वाहतुकीचा नेहमी मोठा त्रास होत आहे त्या ठिकाणी एकही कर्मचारी नाही या विषयावर अनेक संघटना पक्ष यांनी निवेदन देखील दिले आहेत तरी पोलीस प्रशासनाला जाग येत नाही. शहरातील मुख्य बाजारपेठ मुख्य वाहतुकीचे रस्ते अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमले नाहीत परंतु शहराच्या बाहेर चाळीसगाव चौफुली महामार्ग या ठिकाणी एकाच जागेवर असंख्य वाहतूक पोलीस उभे असतात मोठ मोठ्या गाड्या अडवतात नेमका हा प्रकार काय..?

यांना महामार्गावर वसुलीचा अधिकार दिला कोणी थोड्याच अंतरावर महामार्ग पोलीस चौकी असताना यांची गरज का असे अनेक प्रश्न वाहन चालकांना पडत असतो. शहरात ज्या ठिकाणी वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे त्या ठिकाणी ह्या वाहतूक पोलिसांची नेमणूक केली पाहिजे कारण शासनाचा आर्थिक गैर उपयोग होत असताना दिसत आहे यावर बावनकुळे साहेब त्यांच्या व्हाट्सअप वर तात्काळ दखल घेतील कारण प्रश्न जनतेच्या हिताचा आहे.













