धुळे : महाराष्ट्र शासनातर्फे धुळे येथे शासकीय गुलमोहर विश्रामगृह परिसरात अति महत्त्वाच्या व्यक्तींकरिता नवीन विश्रामगृह बांधकाम करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे 444 लक्ष रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाचं राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र दिनी भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार अनु अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी महा प्रदीप करपे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बांधकाम विभागाचे अभियंता धर्मेंद्र झाल्टे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्या कामाची संकल्पना आमदार अनुप अग्रवाल यांची आहे.
