धुळे: रेल्वे स्टेशनच्या विविध विकास कामांचं २२ मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन लोकार्पण करतील अशी माहिती धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश जाधव यांनी रविवार दिनांक १८ मे रोजी पत्रकार परिषदेत दिली. जाधव यांनी आपल्या दालनात झालेलया पत्रकार परिषदेत सांगितले की, धुळे रेल्वे स्टेशनमधील विविध विकासकामांना सन 2023 मध्ये सुरुवात झाली व ऑगस्ट 2024 ला काम पूर्ण झालेलं आहे. या कामांतर्गत धुळे स्टेशनला रेल्वे विभागाकडून नऊ कोटी 49 लाख रुपये विकास निधी मिळाला होता. यातून धुळे स्टेशन साठी विविध प्रकारची कामे करण्यात आली. या कामांमध्ये ऑफिसर्सच्या दालनांचं नूतनीकरण, स्टेशन प्रबंधक कार्यालय, लेडीज व जेन्ट्स जनरल टॉयलेट्स, अपंगांसाठीचे टॉयलेट, प्लॅटफॉर्मचे नवीन शेड तयार करण्यात आले. अशा प्रकारची नवीनच पहिल्यांदाच आपल्याकडे उभारणी केली गेली. याशिवाय स्टेशनला प्लॅटफॉर्मवर व बाहेरील सर्क्युलेटिंग एरियामध्ये संपूर्ण क्लिनिंग टाइल्सचं नवीन काम करण्यात आलं. प्लॅटफॉर्म जास्त वाढवण्यात आला. एक सुंदर असा गार्डन तयार करण्यात आले. याशिवाय इलेक्ट्रिकचे झुंबर आणि डेकोरेटिव्ह लाईट्स हे सर्क्युलेटिंग एरिया मध्ये सुद्धा लावण्यात आले आहेत. अलाउंसिंग सिस्टीम नवीन लावण्यात आलेली आहे. ट्रेन इंडिकेटर नव्हते ते बसविण्यात आले. एंट्री आणि एक्झिटचेह भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले. स्टेशनच्या नावाचे नवीन अत्याधुनिक बोर्ड लावण्यात आले. पाचोरा जामनेर मिनी ट्रेनच्या बोगीचा वापर करून आगळीवेगळी जनरल व बुकिंग तिकिटव्यवस्था सुरु करण्यात आली. अशा प्रकारची विविध विकासकामे अमृत बारा स्टेशन स्कीम मध्ये करण्यात आलेली आहेत. या कामांचं लोकार्पण दिनांक 22 मे 2025 सकाळी नऊ ते दहाच्या वाजेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आजी माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह निमंत्रित मान्यवर उपस्थित राहतील. धुळेकर नागरिकांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश जाधव यांनी यावेळी केले.

