धुळे -धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील सैनिक शाळेमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिक शालेय संस्थेकडून इयत्ता सहावी वर्ग साठी प्रवेश नाकारला असून संस्थेने विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असे निवेदन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की आमचे मुलं हे सैनिक शाळेमध्ये सन 2024/25 मध्ये इयत्ता पाचवीत उत्तीर्ण झाले असून आमच्या मुलांना सैनिक शाळेत इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घ्यायचे असून तरी शाळेचे व्यवस्थापनाकडून सर्व पालक सांगण्यात आले की तुमच्या मुलांना 2025 26 मध्ये प्रवेश मिळणार नाही असा शासनाच्या जीआर असल्याचं सांगितलं गेलं तरी पालकांनी व्यवस्थापनाकडे शासनाचा जीआर मागणी केली असता पालकांना जीआर मिळणार नाही असे संस्थेकडून उत्तर मिळाले इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेत असताना सर्व पालकांना संस्थेकडून सांगण्यात आले होते की बारावीपर्यंत तुमच्या मुलांना तिथे शिक्षण घेता येऊ शकते परंतु पाचवी उत्तीर्ण होताच संस्थेकडून उडवाउडीचे उत्तर देण्यात येत आहे तसेच इयत्ता पाचवी वर्ग प्रवेश घेत असताना शासनाच्या 100 रुपयाचा स्टॅम्प देखील करण्यात आला होता त्यात देखील त्याचा उल्लेख आहे. तरी आमच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असून आमच्या पाल्यांना या ठिकाणी प्रवेश मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले आहे. यावेळी नामदेव गोसावी, प्रकाश गावित, किरण पवार, बबन गावित, संभाजी भिल, गणेश गावित, महारु गांगुर्डे, हरीलाल पवार, गणेश पावरा, ईश्वर भोसले यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

