धुळे : बाळापुर गावात दीड कोटी रुपये चे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आ. अनुप अग्रवाल आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.गेल्या अनेक महिन्यांपासून बाळापुर गावात रस्ते, गटारी व नाल्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून आणि प्रलंबित कामांसाठी पाठपुरावा करत, अमित पवार आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुमित पवार यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. या प्रयत्नांना यश मिळून, माजी मंत्री डॉ. भामरे व आ. अग्रवाल यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामांमध्ये बाळापुर गावातील अंतर्गत रस्त्यांची निर्मिती, आदर्श एकता नगर येथे काँक्रीट रस्ते आणि बंदिस्त गटार, अमरधामजवळील कोळी नाल्यावर फरशी बसविण्याचे काम, बोरसे नगर परिसरात काँक्रीट रस्त्यांचा समावेश आहे. या विकास कामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सुमित पवार यांच्या प्रयत्नांची दखल घेत गावकऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी माजी सरपंच प्रकाश मराठे, अरुण पाटील, भटूपाटील, विनायक मराठे, अशोक मराठे, अशोक पाटील, यशवंत पाटील, रोहिदास पाटील, बापू पाटील, अनिल जगताप, दगडूमराठे, बंटी मंगळे, दतु पाटील, बापू ठाकूर, अंकुश बङ्गुजर, देविदास वाघ, पिंटूभामरे, जगदीश काळे, किरण मराठे, कैलास पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.













