धुळे: तालुक्यातील लामकानी गावात धक्कादायक घटना घडली आहे शेतात सोबत राहत असलेल्या एका महिलेचा प्रियकर दारू पिऊन दीड वर्ष्याच्या मुलाची हत्या करून शेतात बुजवण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेची मिळताच मुलाची आई व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

इसम पंकज बापु बागुल राहणार -लामकांनी हा महिला प्रियसी सुरेखा बापु सोनवणे व तिचा मुलगा कार्तिक बापु सोनवणे वय -18 महिने यांच्यासोबत सागर गुलाब गिरासे रा. ठी. रामी यांच्या शेतात 15 दिवसापासून राहत होता साधारण 12 दिवस आधी आरोपी पंकज बागुल याने मुलगा कार्तिक सोनवणे याला दारूच्या नशेत फेकून दिले त्यात मुलाचा मृत्यू झाला आहे त्यानंतर सदर घटना लपविण्यासाठी त्याने सदर मुलाचा मृतदेह बाजूच्या शेतात बुजून दिला आहे ही संपूर्ण घटना स्थानिक पोलिसांना कळताच त्याच्यावर कारवाईसाठी सुरुवात केली आहे.
