धुळे : राजस्थान येथील वाहन अफू या मादक पदार्थाला अवैधरित्या तस्करी करत मालेगावच्या दिशेने जात असताना पोलिसांचा संशय आल्यावर तेथून पळ काढल्याने मोहाडी पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल सहित आरोपीला ताब्यात घेतली आहे.
दिनांक 29रोजी मोहाडी नगर पोलीस ठाणे येथील पोहेकों सचिन वसंत वाघ, चेतन राजेंद्र झोळेकर व वाहन चालक मंगल धर्मदास पवार अशांना मोहाडी पोलीस ठाणे अंतर्गत रात्रगस्त डयुटी नेमण्यांत आलेली असतांना दिनांक 30रोजीचे पहाटे 05.00 वा. सुमारांस मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वर लळींग गावाजवळील इंडीयन ऑईल पेट्रोलपंजाजवळ एक संशयीत गोल्डन कलरची इंनोव्हा वाहन हि धुळे कडून मालेगांव कडे जात असतांना सदर वाहन चालकांस वाहन थांबवण्याचा इशारा केला असता सदर कार चालक याने वाहन न थांबविता एम.एच. 18 ढाब्यापासून यु टर्न मारुन परत धुळयाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस अंमलदार यांनी सदर कारचा पाठलाग करून इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळील सव्हीस रोडवर कार थांबविली. परंतु त्यातील चालक हा कारच्या चावीसह अंधाराचा फायदा घेवून लळींग गावाच्या दिशेने पळून गेला. सदर कारचालकाचा पाठलाग करून त्यांस लळींग गावाचे पुढे लळींग घाटात पकडून त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव ।) रमेश भवराराम बिष्णोई, वय-33 वर्षे, रा. हेमनगर, जोलीअली, ता.जि. जोधपुर, राज्य राजस्थान असे सांगून व त्याचे सोबत असलेल्या त्याचा पळून गेलेला साथीदार त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव 2) महेश साहू, रा. खोखरीया, ता.जि. जोधपुर, राज्य राजस्थान असे सांगितले. वाहन चालक याचे ताब्यात वरील नमुद वाहनात राखाडी काळपट रंगाच्या पिवळया पट्टया असलेल्या 10 प्लॅस्टीकच्या गोणीत 181.306 किलोग्रॅम वजनाचा वाहनासह रक्कम रुपये 24,07,530/- किंमतीचा अफुच्या झाडांचे फुटलेल्या फळाचे सुकलेली टरफल्यांचा चुरा उम्र वास येत असलेली मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा मादक पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता कब्जात बाळगुन तिची चोरटी वाहतुक करीत असतांना तसेच वाहनांवर व वाहनात बनावट नंबर प्लेट बाळगतांना मिळून आल्याने तो कायदेशीर कारवाई करून जप्त करण्यांत येवून वर नमुद वाहन चालक व त्याचा पळून गेलेला साथीदार यांचे विरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क). 17 (क) सह भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) प्रमाणे फिर्याद पोहेकों / 39 सचिन वसंत वाघ यांनी दिले वरून मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यांत आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकात श्रीराम पाटील यांचे अधिनस्त विशेष पथकातील अशोक पायमोडे, पंकज चव्हाण, संदीप कदम, मुकेश मोरे, प्रकाश जाधव व मनिष सोनगिरे या पथकाने कामगिरी पार पाडली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई/अशोक पायमोडे नेम. मोहाडी नगर पोलीस ठाणे हे करीत आहेत.












