धुळे : पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी धावत असतांना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली असे सांगण्यात येत आहे परंतु गोपनीय सूत्राच्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थीला कुठल्यातरी चुकीमुळे शिक्षा म्हणून ग्राउंड वर धावण्यासाठी सांगितले अशी माहिती मिळाली आहे परंतु त्या ठिकाणी संपूर्ण प्रशिक्षणार्थी त्या एकत्र येऊन मोठा उद्रेक केला आहे त्यामुळे म्हणून या घटनेला मोठे संशयाचे कारण ठरत आहे त्या ठिकाणी बातमीसाठी आलेल्या प्रसार माध्यमांना त्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी मज्जाव केला आहे प्रशिक्षणार्थ्यांनी पत्रकारांना आत येण्यासाठी विनंती केली आहे परंतु या ठिकाणी गेटवरच अडवले जात आहे मुख्य कारण काय ते अद्याप देखील समजले नाही.
ह्या ठिकाणी अधिकारी विजय पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे पंकज घावट हे चेस्ट नंबर 609 अमरावतीचे रहवासी असून 8 महिन्यापासून प्रशिक्षण सुरु होते धुळे प्रशिक्षण केंद्र ह्या ठिकाणी आज सकाळी 9:15 वाजे दरम्यान ग्राउंड सुरु असतांना गेट जवळ आल्यावर त्रास सुरु झाला व सिव्हिल हॉस्पिटल येथे मयत घोषित केले असे ह्या ठिकाणी सांगण्यात आले आहे.













