धुळे : देवपूर परिसरात दिनांक 08 मे रोजी नरेश गवळी व ऋषभ शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आल होता सदर गुन्हयात कुख्यात आरोपी नरेश कांतीलाल गवळी व ऋषभ राजेंद्र शिरसाठ रा नगावबारी देवपुर धुळे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते देवपुर पोलीस ठाणे कडील पोलीसांनी गुप्त बातमीव्दारे माहिती मिळवली की, सदर दोन्ही आरोपी हे ब्राम्हणगाव ता सटाणा जि नाशिक या ठिकाणी लपुन बसलेले आहेत त्यानुसार देवपुर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी पोसई जी डी आधाव व शोध पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी रवाना केले.

मिळालेल्या तांत्रिक व गुप्त बातमीच्या आधारे देवपुर शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरील अज्ञात विकाणी धाडसी छापा टाकत वर नमुद दोन्ही आरोर्पीना व त्यांना सहाय्य करणार नितीन एकनाथ पाटोल रा देवपुर धुळे यांना ताब्यात घेतले आहे त्याने मुख्य आरोपींना लपुन ठेवण्यासाठी सहाय्य केले म्हणुन त्यचेविरुध्द बीएनएस कलम 249 प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन आरोपी 1) नरेश कांतीलाल गवळी 2) ऋषभ राजेंद्र शिरसाठ रा नगावबारी देवपुर धुळे यांना मा न्यायालयासमक्ष हजर केले असता मा न्यायालयाने आरोपींना दिनांक 28/05/2025 पावेतो पोलीस कोवही रिमांड मंजुर केलेली आहे.वरील धाडसी कारवाईत देवपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील, पांसई आधार, असई मिलिंद सोनवणे, पोकों खैरनार, पोकों प्रविण पाटील, पोकों सौरव कुटे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे, या कारवाईसाठी मा श्री श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक धुळे, मा श्री किशोर काळे, अपर पोलीसअ धिक्षक धुळे, मा श्री राजकुमार उपासे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर उपविभाग धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली.
