धुळे शहरातील वार्ड क्रमांक 16 या ठिकाणी अनेक वर्षापासून नागरिकांना कुठल्याच सोयी सुविधा मिळत नसल्याने वार्डात इतर नगरसेवकांसोबत दलित नगरसेवक असून दलित वस्तीची अवस्था वाईट म्हणून संताप व्यक्त केला आहे व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
धुळे : या निवेदनात असे म्हटले आहे की प्रभाग क्रमांक 16 मधील दलित वस्ती अंतर्गत दलित वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा नसून या ठिकाणी नागरिकांचे अतोनात हाल होत असून पूर्ण नूतन पंचशील कॉलनी परिसरात घाण्याचे साम्राज्य पसरले आहे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्व सांडपाणी गटारी नसल्याकारणाने रोडावरून वाहत आहे महानगरपालिकेचे कर्मचारी झाडू मारण्यासाठी येत नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीव जंतुनाशक फवारणी केली जात नाही या ठिकाणी लाईट देखील खांबांवर राहत नाही तरी या सर्व गोष्टींमुळे सर्व नागरिकांचे हाल होत असून सर्वांचे आरोग्य देखील धोक्यात आहे. सफाई कर्मचारी हे सदरहु विभागात येत नाही. दुसऱ्या विभागत येवुन सफाई कर्मचारी योवुन साफसफाई करतात, परंतु आम्ही सदरहु सफाई कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देतात असा आरोप नागरिकांनी या ठिकाणी करण्यात आला आहे सदरचा त्रास हा गेल्या २० ते २५ वर्षापासून असून कोणत्याही नगरसेवकाने सदर परिसरात कोणत्याही गोष्टीची सुविधा पुरविलेल्या नाहीत. वरील कामासाठी आमदार निधी, दलित निधी, व जिल्हा नगरोत्थान व मुलभुत निधी मार्फत आलेला पैसा हा कोणत्या कारणासाठी वापरण्यात आलेला आहे याचे ही स्पष्टीकरण आपल्या विभागा मार्फत करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर बाबत आमच्या मार्फत वारंवार निवेदन देवुन ही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही जर या निवेदनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे.













