जैन सोशल ग्रुप 244 धुलिया चा पदग्रहण समारंभ रविवार दिनांक 15 जून रोजी धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल आर्किड येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बेटी बचाव बेटी पढाव च्या संयोजिका अल्फा अग्रवाल उपस्थित होत्या.

यावेळी मंचावर जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरीश चोरडिया, प्रमुख मार्गदर्शक आशा छाजेड, प्रतिभा बेंगानी, निवृत्त अध्यक्ष सचिन कापडिया आदी मान्यवर उपस्थित होते. जैन सोशल ग्रुप 244 धुलियाच्या अध्यक्षपदी ललिता सांड तर सचिवपदी रिंकल राठोड यांची निवड घोषित करण्यात आली. कोषाध्यक्ष आशिष कुचेरिया, उपाध्यक्ष वर्धमान सिंघवी, उपाध्यक्ष गिरीश कोचर, नीना बाफना, सहसचिव माधुरी कापडिया, सहकोशाध्यक्ष पियुष बापना यांची निवड करण्यात आली आहे. मान्यवरांच्या मनोगतानंतर नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी तसेच संचालक मंडळाने आपल्या पदांची शपथ ग्रहण केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवर आणि उपस्थितांनी सत्कार करून त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला जैन समाज बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.













