धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या शुभम गुप्ता यांच्यावर काही दिवसातच अविश्वास ठराव पारीत करण्यात आला होता हा विषय देखील पूर्ण राज्यभरात चर्चेत होता.गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या गाय वाटप घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांचे सांगलीतील बहुचर्चित ७ लाखांच्या लाचखोरी प्रकरणातही नाव पुढे आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रशासकीय सेवेच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांनी राज्यातच नवे तर देशात नावलौकिक मिळविलेला शुभम गुप्तावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनात गुप्ताची पाठराखण कोण करतेय, असा प्रश्न उपस्थित होतोय अनेकांनी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
