धुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मनमानी कारभारा विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री डॉ. पंकज साळुंखे यांनी हकलपट्टीची मागणी केली आहे. जिल्हा परिषद सिओंच्या कार्यालयातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. तसेच बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे.
जिल्हा परिषद सिओंच्या दालनाचे नूतनीकरण साठी 36 लाख रुपयांचा खर्च केला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक काम नरवाडे यांनी केले या फंडाचा उधळपट्टी सुरू असून याकडे मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्रयां कडे तक्रार देखील केली आहे जर येत्या पंधरा दिवसात जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांची तात्काळ उचल बांगडी केली नाही तर मी आत्मदहन करेल याची सर्वस्व जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि धुळे जिल्हा प्रशासन याची राहील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी दिला आहे….
बाईट: पंकज साळुंखे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, मराठा आघाडी महामंत्री
