धुळे : राष्ट्रवादी अजित पवार गट तर्फे नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या घेऊन धुळ्यात मोठ्या प्रमाणावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या ठिकाणी आंदोलनात यमराज सजीव प्रतिकृती देखील दाखवण्यात आली होती व पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या ठिकाणी त्यांच्या महत्त्वाच्या अशा मागण्या होत्या की धुळेकर नागरिकांवर लादलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टी तत्काळ कमी करण्यात यावी. शहराचे झोन पाडून त्यात देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करून मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी. पावसाळा सुरु होऊनही अदयाप पूर्णपणे नाले सफाई झालेली नाही. शहरातील अनेक कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत काटेरी झुडपे उगलेली आहेत. तसेच ठिकठिकाणी घाण पाण्याचे तलाव साचलेले आहेत.

यासंदर्भात स्वच्छतेची मोहीम तातडीने हातात घेण्यात यावी. साथीच्या आजारापासून नागरिकांची सुटका करावी.शहरातील काही भागात होणार गढूळ पाणी पुरवठा बंद व्हावा. नियमित आणि स्वच्छ पाणी मिळावे.सध्या पावसाळ्यात विजेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. चिखल आणि घाणीचे साम्राज्य यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी अक्षरशः रस्ता शोधत जावे लागते, म्हणून महानगर पालिकेने आवश्यक त्याठिकाणी पथ दिव्यांची संख्या वाढवावी. अशा अनेक मागण्या घेऊन महापालिकेत ढोल बजाव आंदोलन घेऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आले.













