धुळे : प्रसिद्ध विधीतज्ञ दिवंगत कालकथित दिगंबर केशव वाघ यांच्या पाचव्या स्मृतीदिन निमित्त एक हात रुग्णांच्या मदतीसाठी कार्यक्रम राबवून गरजू रुग्णांना फळ वाटप करून अभिवादन करण्यात आले.

दिवंगत कालकथित भैय्यासाहेब दिगंबर केशव वाघ यांच्या पाचव्या स्मृतीदिन निमित्त ” एक हात रुग्णांच्या मदतीसाठी ” उपक्रम राबवून श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे सामाजिक क्षेत्रातील अनेक नागरिकांच्या हस्ते रुग्णांना अन्नदान फळ वाटप करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. चारुदत्त व्यवहारे साहेब, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. रावसाहेबजी गिरासे, मा.नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, मा. नगरसेवक योगेश ईशी, बालरोगतज्ञ डॉ. खलील जी अन्सारी, पै. सनी वाघ, केतन साळवे, बॉबी नागमल, अतुल शिंदे, संतोष सिंघानिया, रोहित म्हसदे, आकाश वाघ व असंख्य नागरिक हिरे मेडिकल हॉस्पिटल येथे या कार्यात सहभागी होते.

