नाशिक : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका बातमीने वाहतूक पोलिसाचे निलंबन केले आहे नाशिक येथील एका रिक्षा चालक एजंटच्या माध्यमातून लाच घेत असताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस उपयुक्त यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे काही धुळे ग्रामीण भागातील वाहतूकदार प्रवास करत असताना नाशिक येथील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडी अडवत गाडीवर दंड टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी उभा असलेला एक रिक्षा चालक एजंट त्या ठिकाणी मध्यस्थी करत तळजोडीअंती पाचशे रुपयाची लाच मागणी केली वाहतूकदाराने तो संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसार माध्यमांना दिला व सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला त्यामुळे तात्काळ याची दखल घेत नाशिक उपायुक्त चंद्रकांत खांडवी साहेब यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे त्यामुळे पुन्हा वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

