खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 22 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. नवरात्र उत्सवानिमित्त एकवीरा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. यात पहाटे पायी जाऊन देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
प्रामुख्याने या त महिला मोठ्या संख्येने दिसून येतात. नवरात्र उत्सवात दरम्यान देवीच्या दर्शनासह विविध पूजा विधि आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या पार्श्वभूमीवर आई एकवीरा देवी मंदिर ट्रस्ट तर्फे भाविकांच्या गर्दीची संख्या लक्षात घेऊन दर्शनासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भव्य मंडप उभारण्यात आला असून प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेता येईल अशा पद्धतीने रेलिंग लावले आहेत. नवरात्रोत्सवासाठी मंदिर परिसरात विविध पूजा साहित्य विक्रीची दुकाने थाटले आहेत. एकंदरीतच या नवरात्रोत्सवा दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पडावा. कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत या सर्व दृष्टीने देवपूर पोलीस स्टेशन तर्फे विविध उपायोजना करण्यात आले आहेत. मंदिरात आणि मंदिरा बाहेर तसेच नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. मंदिर ट्रस्टसह देवपूर पोलिसांनी देखील स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. एकंदरीतच या संपूर्ण नियोजना संदर्भात देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान वाघ यांनी अधिक माहिती दिली.













