केक कापून 75 पदार्थांची मेजवानी चा आनंद
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस धुळे शहरात सहजीवन जेष्ठ नागरिक संघातर्फे केक कापून साजरा करण्यात आला. धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमार नगर येथील बहावलपुरी पंचायत भवन येथे हा कार्यक्रम रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांसाठी मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 अन्नपदार्थांची मेजवानी देण्यात आली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन माजी नगरसेवक, भाजपा व्यापारी आघाडीचे नेते तथा सहजीवन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हर्षकुमार रेलन यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. कार्यक्रमाला मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे संपादक मिलिंद बैसाणे, सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी, माजी नगरसेवक सुनील बैसाने, सिंधी साहित्य अकादमीचे सुरेश कुंदनाणी, राजेश गिंडोडिया, ललित आरुजा, पारस दुगड यांच्यासह सिंधी समाज बांधव आणि सहजीवन जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.













